शिवप्रहार न्यूज- “कोल्हार प्रकरणी” हिंदू समाजाचा लोणी पोलीस स्टेशन वर भव्य मोर्चा; सात आरोपींना अटक...
“कोल्हार प्रकरणी” हिंदू समाजाचा लोणी पोलीस स्टेशन वर भव्य मोर्चा; सात आरोपींना अटक...
कोल्हार -राहता तालुक्यातील कोल्हार या गावामधील अंबिकानगर भागात काही धर्मांध मुसलमानांनी हिंदू परिवाराच्या घरावर नंग्या तलवारी घेऊन हल्ला केला होता.यात महिलांसोबत गैरवर्तणूक देखील करण्यात आली होती.
याप्रकरणी पोलिसांनी लवकर कारवाई केली नाही व आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ केली तरी ॲट्रॉसिटी प्रमाणे गुन्हा दाखल केला नाही म्हणून हिंदू समाजाच्या वतीने शिवप्रहार प्रतिष्ठान,श्रीरामपूर,हिंदू राष्ट्र सेना,साई बालाजी ग्रुप,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,भिल्ल समाज संघटना ,हिंदुत्ववादी संघटना व हिंदू समाजाच्या वतीने लोणी पोलीस स्टेशनवर आज सकाळी 11 वाजता मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चाच्या दबावामुळे पोलिसांनी या गुन्ह्यांमध्ये ॲट्रॉसिटी प्रमाणे देखील कारवाई केली असल्याची माहिती मिळत आहे.तसेच या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी जब्बार खान याच्यासह इतर सर्व आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे.