शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात तरुणीच्या खुनाचा प्रयत्न...

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात तरुणीच्या खुनाचा प्रयत्न...

श्रीरामपुरात तरुणीच्या खुनाचा प्रयत्न...

 श्रीरामपूर- श्रीरामपुर शहरातील वार्ड नंबर 02 भागातील शिंदे पानमळा येथे राहणाऱ्या पूजा भागवत जाधव,वय 31 वर्ष,व्यवसाय -नाचकाम हिच्यावर प्राणघातक हल्ला करून तिच्या खुनाचा प्रयत्न झाला आहे.

       याबाबत अधिक माहिती अशी की,आरोपी आसिफ लियाकत पठाण व नजमा लियाकत पठाण दोघे राहणार-पाण्याच्या टाकी जवळ,वार्ड नंबर 2,श्रीरामपूर यांनी फिर्यादी पूजा जाधव हिच्या घरी जाऊन तिच्या घरात घुसून तिला म्हणाले,”नाचगाण्याच्या पार्टीचे पैसे उचल घेऊन दे परंतु नाचण्यास जाऊ नको” अशी मागणी केली.

       त्यावर फिर्यादीने नकार दिला असता आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून आरोपी आसिफ पठाण याने फिर्यादी पूजा हिला जीवे मारण्याच्या उद्देशाने तिच्यावर चॉपरने वार करून गंभीर जखमी केले.फिर्यादी पूजा जाधव हिला जखमी अवस्थेत कामगार हॉस्पिटल श्रीरामपूर येथे दाखल करण्यात आले असून तिच्यावर तेथे उपचार चालू आहे.

      याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या घटनास्थळी श्रीरामपूरचे डीवायएसपी श्री.संदीप मिटके व श्रीरामपूरचे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.सानप यांनी तात्काळ भेट दिली.

      या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.संभाजी पाटील हे करीत आहेत.