शिवप्रहार न्यूज- गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक उलटून सिलेंडर रॉकेटसारखे हवेत फुटले…

शिवप्रहार न्यूज- गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक उलटून सिलेंडर रॉकेटसारखे हवेत फुटले…

गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक उलटून सिलेंडर रॉकेटसारखे हवेत फुटले…

नाशिक -नाशिक जिल्ह्यातील मनमाड ते मालेगाव रोडवर कानडगावजवळ एक गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला.त्यामुळे ट्रकमधील गॅस सिलेंडरला आग लागली आणि स्फोट होऊन गॅस सिलेंडर उंचचउंच हवेत फेकल्या गेले व फुटले.मोठा जाळ त्यामुळे निर्माण झाला.

      या प्रकारामुळे या महामार्गावरील वाहतूक दोन किलोमीटर लांब रोखून धरण्यात आली होती.तसेच अग्निशमन दलाचे बंब देखील घटनास्थळी दाखल झाले.परंतु सिलेंडरचा स्फोट होत असल्यामुळे त्यांना पुढे जाता आले नाही.या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.