शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात शिवजयंतीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीची मोटारसायकल रॅली संपन्न…

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात शिवजयंतीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीची मोटारसायकल रॅली संपन्न…

श्रीरामपुरात शिवजयंतीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीची मोटारसायकल रॅली संपन्न…

श्रीरामपूर - शिवजयंतीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने हजारो मोटरसायकलस्वारांच्या सहभागासह भव्य मोटर सायकल रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.या मोटर सायकल रॅलीत सहभागी होणाऱ्या युवकांकडून दिल्या जाणाऱ्या जयघोषाने संपूर्ण श्रीरामपूर शहर दणाणून गेले होते .

          या मोटर सायकल रॅलीचा शुभारंभ संगमनेर रोड वरील शिवराणा क्रिकेट मैदानापासून भाजपाचे उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रविंद्रजी आनासपुरे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला.भाजपा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर ,पंचायत समितीचे माजी सभापती दीपक पटारे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर दिलीप शिरसाठ ,जी.प. सदस्य शरद नवले , पंचायत समीतीचे उपसभापती तोरणेसर , सुदर्शन नागरी पतसंस्थेचे चेअरमन देविदास चव्हाण , नगरसेवक किरण लूनिया , माजी शहराध्यक्ष संजयजी पांडे ,भाजपाचे जेष्ठ नेते शशिकांत जी कडुसकर , कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण , बेलापूरचे सरपंच महेंद्रजी साळवी ,मार्केट कमिटीचे संचालक मनोज हिवराळे ,पंचायत समितीचे माजी पंचायत समितीचे माजी सदस्य गणेश मूदगूले अभिजीत कुलकर्णी , अर्जुन दाभाडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते

      या रॅलीतील सर्व मोटरसायकलींना भगवे झेंडे लावले . अनेक युवक मोठमोठे भगवे झेंडे घेऊन मोठ्या प्रमाणावर रॅलीत सहभागी झाले होते . या रॅलीचा 2 किलोमीटरचा संपूर्ण परिसर भगवामय झाल्याचे दृष्य यावेळी उपस्थितांना दिसत होते . छत्रपती शिवाजी महाराज की जय , जय भवानी जय शिवाजी , भारत माता की जय , वंदे मातरम या घोषणा देऊन रॅलीतील युवकांनी सारे श्रीरामपूर शहर दुमदुमून टाकले होते. ही मोटरसायकल रॅली शिवराणा क्रिकेट मैदान संगमनेर रोड पासून निघून नॉर्दन ब्रॉच , ओबेरॉय पेट्रोलपंप ,शिवाजी चौक , शिवाजी रोड , नगरपालिका मार्गे गिरमे चौकातून ,मेनरोड , वसंत टॉकीज चौकातून ,आजाद मैदान , श्रीराम मंदिर चौक , महात्मा गांधी चौक , एसटी स्टँड नेवासा रोड मार्गे मार्केट यार्ड येथे पोहचली व मार्केट यार्ड येथेच या रॅलीची सांगता करण्यात आली.भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र विभागाचे संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे पूर्णवेळ या रॅलीत सहभागी झाले होते.

        ही रॅली यशस्वी करण्यासाठी सोमनाथ कदम ,सोमनाथ पतंगे , संदीप वाघमारे ,संजय यादव ,गणेश भिसे , बाळा साहेब हिवराळे, बाळासाहेब आहिरे ,मदन चौधरी ,बाळासाहेब धनवटे , कैलास शिंदे , अण्णासाहेब थोरात ,सुनील पटारे ,प्रणव भारत ,मदन चौधरी ,सचिन ढोबळे , मच्छिंद्र बांद्रे ,देविदास वाघ , संजय राऊत ,लखन लोखंडे ,विजय लांडे ,गणेश बिंगले , महेश विश्वकर्मा ,बबन जाधव , सौरभ गवारे ,बिट्टू कक्कड , राजू पडवळ , गणेश खरात ,सागर मलिक , शेखर आहिरे, सिद्धार्थ साळवे ,उत्तम राशिनकर सागर वाघ ,रमेश शिणगारे , चंद्रकांत वायकर , विजय गांगुर्डे , संजय रुपटक्के ,सचिन मांडोळे ,गणेश जायगुडे , जाबिर शेख ,सुभाष ओहळ ,शिवाजी शिंदे , गणेश खरात ,शुभम हरदास ,दर्शन चव्हाण , विकी देशमुख ,रवींद्र चव्हाण ,विकी मस्के , रामदास धोत्रे ,उमेश धनवटे , विशाल जाधव, जना जगधने , किशोर रोकडे ,भारत शेळके , भारत लोखंडे ,रितेश काटे , सुनील शिंदे ,राजू मोरे , किशोर रोकडे ,भारत भिंगारे ,दत्ता पवार , सचीन क्षिरसागर , संदीप साठे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले .