शिवप्रहार न्यूज-सेवनिवृत्त होणा-या ३३ कर्मचा-यांचा सत्कार…
सेवनिवृत्त होणा-या ३३ कर्मचा-यांचा सत्कार…
शिर्डी –
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डीच्या आस्थपनेवरील विहित वयोमान (६० वर्षे) पुर्ण होवून सेवनिवृत्त होणा-या ३३ कर्मचा-यांचा सत्कार संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या हस्ते करण्यात आला.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डीच्या वतीने आस्थपनेवरील माहे मे-२०२२ मध्ये विहित वयोमान (६० वर्षे) पुर्ण होवुन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांमध्ये व्दारावती भक्तनिवासस्थान प्र.अधिक्षक पोपट निर्मळ, श्री साईबाबा भक्तनिवास्थान प्र.अधिक्षक सुनिल सावंत, वाहन विभाग प्र.अधिक्षक प्रकाश क्षिरसागर, मंदिर विभाग पुजारी बाळासाहेब जोशी यांच्यासह विविध विभागांचे एकुण ३३ कर्मचा-यांचा समावेश आहे. संस्थानच्या वतीने या सर्व कर्मचा-यांचा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या हस्ते श्रींची मुर्ती, शॉल व प्रशस्तीपत्रक देवुन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत म्हणाल्या, आज ३३ कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने संस्थानमध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज श्री साईबाबा संस्थानची गणना देशात क्रमांक ०२ ची आहे. या प्रगतीच्या प्रवासात या सेवानिवृत्त कर्मचा-यांची केलेले काम नक्कीच उल्लेखीनीय असून संस्थानच्या नावलौकीकात त्यांचे मोठे योगदान आहे. या सर्व कर्मचा-यांच्या कामाचा आदर्श पुढील पिढीने घेवुन यापुढची वाटचाल करावी, असे सांगुन या सेवानिवृत्त कर्मचा-यांनी अनेक वर्ष या ठिकाणी कर्तव्याचे पालन करुन उत्तम सेवा केली त्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी त्यांचे अभिनंदन करुन त्यांना त्यांच्या आरोग्यासाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या सेवानिवृत्ती कार्यक्रमास संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, सामान्य प्रशासन प्र.अधिक्षक नवनाथ कोते, प्रकाशने विभाग प्र.अधिक्षक विश्वनाथ बजाज, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.