शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर स्मशानभुमीत राहणारी मुलगी १० वी उत्तीर्ण …

श्रीरामपूर स्मशानभुमीत राहणारी मुलगी १० वी उत्तीर्ण …
श्रीरामपूर - नगरपालिकेच्या स्मशानभुमीत राहत असलेले म्हसणजोगी सोनू कडमंचे यांची मुलगी अंजली कडमंचे हिने प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून मार्च २०२२ ची दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.
समाजात अनुकूल परिस्थितीत अभ्यास करून यश तर कोणीही मिळवत असते.परंतु अंजलीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उत्तीर्ण झाल्याबद्दल डावखर कन्या विद्यालयाच्या शिक्षकांनी तिच्या घरी म्हणजे स्मशानभुमीत जाऊन तिचा नुकताच सत्कार केला.
शिवप्रहार न्युज च्या वतीने शुभेच्छा.