शिवप्रहार न्यूज- बेलापुरात घरगुती गॅस टाकीचा स्फोट; चार जण गंभीर जखमी…

बेलापुरात घरगुती गॅस टाकीचा स्फोट; चार जण गंभीर जखमी…
श्रीरामपूर- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावामधील गाढे गल्ली या भागात राहणाऱ्या शशिकांत अशोक शेलार यांच्या घरात आज सकाळी सात वाजताच्या सुमारास घरगुती गॅस टाकीचा प्रचंड मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये शशिकांत शेलार यांच्यासह त्यांची पत्नी ज्योती शेलार, मुलगा यश शेलार ,वय 13 वर्ष व मुलगी नमोश्री शेलार ,वय सात वर्ष हे गंभीर जखमी झाले आहेत.
या गॅस टाकीचा स्फोट इतका भयानक होता की,शेलार यांच्या घराचे पत्रे निखळून उडून पडले.घराच्या भिंतीला हादरे बसून चिरा पडल्या.घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त होऊन पडलेले दिसले.
सकाळी -सकाळी घडलेल्या या घटनेमुळे बेलापूर गाव हादरून गेले आहे.यातील जखमींना पुढील उपचार कामी लोणी येथे प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.