शिवप्रहार न्यूज - कोवीड सेंटर ला नगराध्यक्षांकडुन एक लक्ष रुपयांची मदत...
कोवीड सेंटर ला नगराध्यक्षांकडुन एक लक्ष रुपयांची मदत...
श्रीरामपूर -
श्रीरामपूर नगरपालिकेच्यावतीने सुरू करण्यात येणाऱ्या कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांना आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात यासाठी स्व. गोविंदराव आदिक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्याकडून १ लाख रुपयाचे अर्थसहाय्य जाहिर करण्यात आले आहे. मागील वर्षीच्या लॉकडाउनच्या काळात देखील नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी शहरात किराणा सामानाचे वाटप केले होते.याशिवाय सॅनीटायजर,मास्क देखील देण्यात आले होते. वाढणारी कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता शहरात पालिकेच्या वतीने कोविड सेंटर सुरू करण्यात येणार असून या कोविड सेंटरला रपये १ लाखाची मदत अनुराधा आदिक यांनी केली आहे.