शिवप्रहार न्यूज - कुरकुरे दिले नाही म्हणून महिलेचा विनयभंग;टाकळीभान येथील आरोपींविरोधात गुन्हा दाखल...

शिवप्रहार न्यूज - कुरकुरे दिले नाही म्हणून महिलेचा विनयभंग;टाकळीभान येथील आरोपींविरोधात गुन्हा दाखल...

कुरकुरे दिले नाही म्हणून महिलेचा विनयभंग;टाकळीभान येथील आरोपींविरोधात गुन्हा दाखल...

श्रीरामपूर - श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान गावात एका किराणा दुकानात असलेल्या महिलेला आरोपी उमेश रणवरे ,किशोर शिंदे ,विवेक शिंदे ,मंगेश रणवरे ,सर्व राहणार -टाकळीभान यांनी दारू पिऊन येऊन कुरकुरे मागितले. 

          किराणा दुकानातील महिलेने कुरकुरे दिले नाही म्हणुन त्याचा राग आल्याने वरील आरोपींनी फिर्यादी महिलेला शिवीगाळ करून ,चापटीने मारून व लज्जा उत्पन्न होईल असा स्पर्श करून विनयभंग केला.

         तसेच फिर्यादी महिलेचा मुलगा हा फिर्यादी महिलेला वाचवण्यासाठी मध्ये पडला असता त्याला देखील वरील चार आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून, जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे.

        तरी फिर्यादी पीडित महिलेच्या तक्रारीनुसार श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 201/2021 अन्वये विनयभंग वगैरे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

           गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार पवार हे पोलीस निरीक्षक श्री.साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. सदर गुन्ह्याचे घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक श्री.बोरसे यांनी तात्काळ भेट दिली.