शिवप्रहार न्यूज- नगर एसपींनी घेतली जिल्ह्यातील बँक प्रतिनिधींची बैठक;बँक प्रतिनिधींना केल्या महत्त्वाच्या सूचना…

शिवप्रहार न्यूज- नगर एसपींनी घेतली जिल्ह्यातील बँक प्रतिनिधींची बैठक;बँक प्रतिनिधींना केल्या महत्त्वाच्या सूचना…

नगर एसपींनी घेतली जिल्ह्यातील बँक प्रतिनिधींची बैठक;बँक प्रतिनिधींना केल्या महत्त्वाच्या सूचना…

नगर - नगर जिल्ह्यातील एटीएम मधील रोख रक्कम चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने व एटीएम गॅस कटिंग करून घेऊन जाणे ,चोरीसाठी त्याच्यात स्पोट घडवणे अशा देखील घटना अगदी नजीकच्या काळात घडल्या आहेत.

      त्यामुळे नगर जिल्हा पोलीस प्रमुख श्री.मनोज पाटील यांनी बँक प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना भारतीय रिझर्व बँकेच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या.यामध्ये प्रामुख्याने एटीएमच्या बाहेर सुरक्षारक्षक नेमणे,एटीएम सर्विस सेंटर मध्ये इंटरनेट कनेक्शन ठेवणे,एटीएम मध्ये अलार्म लावणे अशाच्या महत्वाच्या सूचना त्यांनी बँक प्रतिनिधींना दिल्या.

        तसेच बँक प्रतिनिधींना सूचना दिल्यानंतर CRPC 149 प्रमाणे नोटीस देखील देण्यात आली आहे.यावेळी श्रीरामपूर विभागाच्या अप्पर अधीक्षक डॅाक्टर दिपाली काळे या देखील उपस्थित होत्या.