शिवप्रहार न्यूज - संभाव्य तिसर्या लाटेच्या अनुषंगाने श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाला (उप जिल्हा)कलेक्टर व CEO यांची भेट...
संभाव्य तिसर्या लाटेच्या अनुषंगाने श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाला (उप जिल्हा)कलेक्टर व CEO यांची भेट...
श्रीरामपूर-आज मा.जिल्हाधिकारी डॅा.राजेंद्र भोसले व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन PSA ऑक्सिजन प्लँट व वाढीव 50 ऑक्सिजन बेड सुविधेच्या कामाची पाहणी केली.
कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या क्षमता वाढीसाठी प्रशासनाने दक्ष राहून कार्यवाही करावी. तसेच कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी देखील मास्कचा वापर,सामाजिक अंतरसारख्या उपायांचा अवलंब करावा, विवाह समारंभ शक्य तितकी कमी उपस्थिती ठेवून पार पाडण्याचे व कोविड नियमांचे कठोर पालन करण्याचे आवाहन मा.जिल्हाधिकारी यांनी केले.
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गावागावातील पदाधिकाऱ्यांनी हिवरेबाजारच्या धर्तीवर एकजुटीने काम करून गावे कोरोनामुक्त ठेवण्याची गरज प्रतिपादित केली.
यावेळी मा.उपविभागीय अधिकारी श्री.अनिल पवार , तहसीलदार श्री.प्रशांत पाटील यांच्यासह उप अभियंता,सा बा.वैद्यकीय अधीक्षक,श्रीरामपूर तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.