शिवप्रहार न्यूज- डंपरने महिलेच्या स्कुटीला धडक दिल्याने महिला जखमी…

शिवप्रहार न्यूज- डंपरने महिलेच्या स्कुटीला धडक दिल्याने महिला जखमी…

डंपरने महिलेच्या स्कुटीला धडक दिल्याने महिला जखमी…

श्रीरामपूर -श्रीरामपूर -राहुरी फॅक्टरी रोडवर नरसाळी गावातील जिल्हा परिषद शाळेसमोर मासेविक्री करणारी महिला सरला परदेशी, वय 42 या त्यांच्या स्कुटी वरून जात असताना एका डंपरने जोरदार धडक दिली.डंपर क्रमांक एम एच 17 एजी 0724 वरील चालकाने हाईघाईने त्याच्या ताब्यातील वाहन चालून स्कुटी वरील महिलेला धडक देऊन जखमी केले.

       तसेच जखमी महिलेला उपचारासाठी न नेता हा डंपर अपघात स्थळावरून फरार झाला.याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ढोकणे हे करीत आहेत.