शिवप्रहार न्यूज- संगमनेर मध्ये ०७ लाख रुपयांचे साडेतीन हजार किलो गोमांस पकडले..

शिवप्रहार न्यूज- संगमनेर मध्ये ०७ लाख रुपयांचे साडेतीन हजार किलो गोमांस पकडले..

संगमनेर मध्ये ०७ लाख रुपयांचे साडेतीन हजार किलो गोमांस पकडले...

 संगमनेर-
 संगमनेर शहरातील जमजम कॉलनी भागात सुरु असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर काल पोलिसांनी छापा टाकून सात लाख रुपये किमतीचे तब्बल साडेतीन हजार किलो गोमांस जप्त केले. महाराष्ट्रामध्ये गोहत्या बंदी कायदा अस्तित्वात असून संगमनेरात मात्र खुलेआम गायींची कत्तल सुरू आहे.
या बेकायदेशीर कत्तलखान्यावर पोलिसांनी अनेक कारवाया केल्या तरीदेखील हे कत्तलखाने बंद होत नाहीत. याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील करण्यात आली आहे त्यावरून पूर्वी दोन छापे पोलिसांनी टाकले होते परंतु आता पुन्हा जमजम कॉलनी येथे मोठा वाडा परिसरात बेकायदेशीर कत्तलखान्या मध्ये जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली म्हणून पोलिसांनी छापा टाकून या कत्तलखान्या मधील तब्बल साडेतीन हजार किलो गोमांस व जिवंत जनावरे जप्त केले या मुद्दे मालाची किंमत एकूण सात लाख रुपये इतकी आहे पोलिसांनी याबाबत पंचनामा केला असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत.
            संगमनेर मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर गोवंशाची कत्तल होत असताना त्यांना रोखण्यात पोलीस प्रशासनाला नेमके अपयश कशामुळे येत आहे असा गोप्रेमी सवाल करत आहेत. म्हणजे नेमके कोणाच्या राजकीय वरदहस्तामुळे संगमनेरात गोवंश हत्या विरोधी कायदा पायदळी तुडवला जातो व खुलेआम गोहत्या होते याचा शोध घेणे आवश्यक आहे.