शिवप्रहार न्यूज- नगरपालिका योजनेमधून रोख पैसे देतो असे म्हणून कर्मवीर चौकातील महिलेची फसवणूक...

शिवप्रहार न्यूज- नगरपालिका योजनेमधून रोख पैसे देतो असे म्हणून कर्मवीर चौकातील महिलेची फसवणूक...

नगरपालिका योजनेमधून रोख पैसे देतो असे म्हणून कर्मवीर चौकातील महिलेची फसवणूक...

 श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील कर्मवीर चौक,वार्ड नंबर एक या भागात राहणाऱ्या एका महिलेला एक अनोळखी चोरटा येवुन तुम्हाला नगरपालिका योजनेमधून 15 हजार रुपये रोख देतो असे म्हणून महिलेच्या ताब्यातुन एकुण 42 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व आधार कार्ड चोरट्याने घेतले .

        त्यानंतर हे सोन्याचे दागिने नगरपालीकेतील साहेबांना दाखवून आणतो असे बोलून हा अनोळखी चोरटा तेथून निघून गेला आणि पुन्हा परत आलाच नाही. 

        यामुळे सदर महिलेची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने महिलेचे पती मुस्ताक शेख यांच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्री.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार काळे हे करीत आहेत.

          नगरपालिका योजनेतून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करण्याचा हा प्रकार अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे.यामुळे यातील आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी जागृक नागरिकांकडून करण्यात होत आहे.