शिवप्रहार न्यूज- अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा…

शिवप्रहार न्यूज- अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा…

अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा…

देवळाली प्रवरा- दि. 16/02/2022 रोजी Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत देवळाली प्रवरा येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व हातभट्टी दारू तयार करत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी देवळाली प्रवरा येथे परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू यांचा नाश करण्यात आला.

        आरोपी. क्र.)1) बापू गायकवाड रा. देवळाली प्रवरा

42,000/- रु. कि.चे 600 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

2,000/- रू किमतीची 20 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)

आरोपी. क्र.) 2. सोमनाथ बर्डे

28,000/- रु. कि.चे 400 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

1,000/- रू किमतीची 10 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं. अं.)

आरोपी. क्र.) 3. रमेश गायकवाड

31,500/- रु. कि.चे 450 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं. अं.)

1500/- रू किमतीची 15 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू ( आंबट उग्र वासाची किं. अं.)

आरोपी. क्र.) 4. आशाबाई बाळासाहेब गायकवाड

24,500/- रु. कि.चे 350 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

2000/- रू किमतीची 20 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं. अं.)

आरोपी. क्र.) 5. वैभव गायकवाड

35,000/- रु. कि.चे 500 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

2,000/- रू किमतीची 20 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं. अं.)

आरोपी. क्र.) 6. ज्ञानेश्वर रामकिसन भागवत

900/- रु. कि.च्या 15 (देशी बॉबी संत्रा) दारू च्या बाटल्या 

            प्रत्येकी 60 रुपये किमतीच्या

-------------------------

 एकूण 1,73,400/-/- रुपये.

            वरील वर्णनाचा व किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल आरोपींचे ताब्यातून जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड ) (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

अचानक झालेल्या या कारवाईमुळे देवळाली प्रवरा परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाई चे देवळाली प्रवरा येथील महिलांनी Dy.s.p. संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक करून आभार व्यक्त केले

        सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. स्वाती भोर, यांचे मार्गदर्शनाखाली Dy.s.p संदीप मिटके, ASI.राजेंद्र आरोळे,H.c. सुरेश औटी, H.c प्रभाकर शिरसाठ पो. कॉ. नितीन शिरसाठ, शशिकांत वाघमारे आदींनी केली.