शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात विश्वरत्न,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी भव्य मोर्चा…

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात विश्वरत्न,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी भव्य मोर्चा…

श्रीरामपुरात विश्वरत्न,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी भव्य मोर्चा…

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- राजकीय लोकांच्या श्रेयवादामुळे श्रीरामपूरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक रखडले असून आज आम्ही न्यायासाठी श्रीरामपूर पालिकेवर मोर्चा आणला आहे. आम्हाला न्याय न मिळाल्यास यापेक्षाही मोठा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर घेवून जाऊ असा इशारा श्रीरामपूर पालिकेवर काढलेल्या मोर्चेकरांनी दिला. 

       आज सोमवारी दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तातडीने व्हावे यासाठी रिपाईचे सर्व गट तसेच वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पार्टी, बहुजन आघाडी यांच्यासह विविध पक्ष, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी श्रीरामपूर नगरपालिकेवर भव्य मोर्चा काढला होता.