शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरातील दोघांचा घाटी रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू.

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरातील दोघांचा घाटी रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू.

श्रीरामपुरातील दोघांचा घाटी रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू...

श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील त्रंबकनगर भागात राहणारे एक 60 वर्षीय व एक 80 वर्षीय नागरिक यांचा कोरोना आजारामुळे संभाजी नगर शहरातील घाटी रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. या दोन्ही मयत व्यक्तींच्या कोरोना मृत्यूबाबत संभाजी नगर शहरातील बेगमपुरा पोलीस ठाणे येथे ००/२१  प्रमाणे अपमृत्यु दाखल होऊन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पुढील चौकशीकामी अपमृत्यू अहवाल हे आलेले आहेत.
              याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला अपमृत्यू क्रमांक 43/2021 व 44 /2021 प्रमाणे नोंद घेण्यात आलेली आहे. या दोन्ही कोरोना बळींच्या मृत्यू बाबत अधिक चौकशी श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री.पटेल व पोलीस नाईक श्री.वांडेकर हे करीत आहेत.
               संभाजीनगर (औरंगाबाद) येथे असलेल्या घाटी रुग्णालयामध्ये नगर सह संपूर्ण मराठवाड्यातील नागरिक उपचारासाठी येत असतात. घाटी रुग्णालय हे मराठवाड्यातील सर्वात मोठे रुग्णालय असून श्रीरामपूर शहरातील अनेक लोक या ठिकाणी कोरोना आजारावर सध्या उपचार घेत आहेत.