शिवप्रहार न्यूज- कर्नाटकातील शिवपुतळा विटंबना प्रकरणी “शिवप्रहार प्रतिष्ठान”च्या वतीने तात्काळ प्रशासनाला निवेदन…
कर्नाटकातील शिवपुतळा विटंबना प्रकरणी “शिवप्रहार प्रतिष्ठान”च्या वतीने तात्काळ प्रशासनाला निवेदन…
श्रीरामपूर -कर्नाटक मधल्या बंगळूर या शहरांमधील सदाशिव नगर भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर काही कानडी समाजकंटकांनी काळा रंग टाकून विटंबना केली होती.
या घटनेचा निषेध म्हणून “शिवप्रहार प्रतिष्ठान”च्या वतीने तात्काळ काल रविवारी सकाळी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात या समाजकंटकांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले.यावेळी शिवप्रहार प्रतिष्ठान चे अठरापगड जातीच्या हिंदुत्वाला मानणारे मावळे उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण-समाजकारण करणारे,फक्त सोशल मेडीयावर बडबड करणारे व शिव व्याख्याने करुन स्वतःचे पोट भरणारे अनेक लोक आहेत.परंतू शिव छत्रपतींचा अपमान झाल्यानंतर रस्त्यावर उतरून त्याचा निषेध करण्याची देखील तयारी यापैकी अनेक लोकांनी दाखवली नाही.
अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत असलेले युगप्रवर्तक- युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यामुळे शिवछत्रपतींच्या मावळ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे.