शिवप्रहार न्यूज- फिर्यादीची न्यायालयात खासगी फिर्याद;श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल…

शिवप्रहार न्यूज- फिर्यादीची न्यायालयात खासगी फिर्याद;श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल…

फिर्यादीची न्यायालयात खासगी फिर्याद;श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल…

श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर एक परिसरातील नवजीवन हाऊसिंग सोसायटी येथे राहणारे जाकीर हुसेन पटेल ,वय 60 वर्ष यांनी न्यायालयात खाजगी फिर्याद दिल्याने हा खूनाचा कोण गुन्हा दाखल करण्यात आला.

       न्यायालयाला दिलेल्या फिर्यादीत जाकीर पटेल यांनी म्हटले की,त्यांचा मुलगा जुनेद जाकीर पटेल,वय सत्तावीस वर्ष याला आरोपी सलीम उर्फ सलमान मुनीर शेख ,वय 27 व आरोपी अख्तर मुनीर शेख ,52 राहणार -जाफराबाद ,तालुका श्रीरामपूर यांनी मागील भांडणाचा राग मनात धरून अक्षय कॅार्नर जवळ त्याला पाण्यात बुडवून 14 फेब्रुवारी 2021 रोजी त्याचा खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने जुनेद याचा मोबाईल काढून घेतला अशी तक्रार त्यांनी न्यायालयात केली होती. त्यानुसार न्यायालयाने सीआरपीसी 156 (3)अन्वये पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते.

     त्या अनुषंगाने नमूद गुन्हा श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात काल रात्री दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास डीवायएसपी श्री. संदीप मिटके व पोलिस निरीक्षक श्री. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.बोरसे हे करीत आहेत.