शिवप्रहार न्यूज- वीकेंड लॉकडाऊन मध्ये दुकान सुरू ठेवले म्हणून श्रीरामपुर येथील दुकानदाराविरूध्द गुन्हा दाखल
वीकेंड लॉकडाऊन मध्ये दुकान सुरू ठेवले म्हणून श्रीरामपुर येथील दुकानदाराविरूध्द गुन्हा दाखल...
श्रीरामपुर - कोरोनाचा संसर्ग रोखन्यासाठी वीकेंड लॉकडाऊन मध्ये दुकान उघडण्यास मनाई असताना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या श्रीरामपुर येथील दुकानदार मारुती विजय बिंगले रा-वॉर्ड नं १ या दुकानदारा विरूध्द दिनांक १० जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,यातील दुकानदार मारुती विजय बिंगले, रा-वॉर्ड नं १ यानी दिनांक १० जुलै रोजी श्रीरामपुर येथील डावखर गल्ली येथे असलेले मारुती ग्लास हे दुकान वीकेंड लॉकडाऊन असूनही उघडले. तसेच मास्क न लावता कोरोना रोगाचा संसर्ग पसरन्याचा संभव असताना लोकांच्या जिवीतास धोका होईल असे कृत्य केल्याचे पोलिसांना आढळून आले .
शहर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवडे यांना हे दुकान उघडले असल्याचे दिसल्यानंतर त्यांनी कारवाई केली. श्री. सोमनाथ गाडेकर,श्री.लाला पटेल ,श्री.राजू मेहर यांच्यासह पोलीस कर्मचारी कारवाईत सहभागी होते.
जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,अहमदनगर यांनी काढलेल्या कोरोना संसर्ग रोखण्याच्या उपाययोजना म्हणून काढलेल्या आदेशाचे उल्लंघण केल्याने पो ना. सोमनाथ गाडेकर यांच्या फिर्यादी वरून पोलिस निरिक्षक संजय सानप यांच्या आदेशाने मारुती बिंगले यांच्या विरुद्ध श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं ४४९/२०२१ भारतीय दंड संहिता कलम १८८,२६९ प्रमाणे गुन्हा दाखल करून गुन्हाचा पुढील तपास श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्याचे अंमलदार करीत आहे.