शिवप्रहार न्यूज- सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सूचनेमुळे नगरपालिकेची निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय होण्याची चिन्हे…

शिवप्रहार न्यूज- सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सूचनेमुळे नगरपालिकेची निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय होण्याची चिन्हे…

सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सूचनेमुळे नगरपालिकेची निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय होण्याची चिन्हे…

 श्रीरामपूर- सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्ग आयोगाने सादर केलेल्या अंतरिम अहवालाला नकार दर्शवला.या अहवालामध्ये राजकीय प्रतिनिधित्व याची योग्य आकडेवारी नसल्याचे न्यायालयाने सांगितले.तसेच सरकारवर देखील न्यायालयाने ताशेरे ओढले.        

         जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय पुढचे आदेश देत नाही तोपर्यंत ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणुका घेण्यात याव्यात.तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येऊ घातलेल्या निवडणुका देखील ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्यात अशी सूचना आज सर्वोच्च न्यायालयाने दिली. 

       त्यामुळे लवकरच येऊ घातलेल्या श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील या निर्णयाचा परिणाम जाणवणार असून नगरसेवक पदाचे ओबीसी आरक्षण यावेळी पाहायला मिळणार नाही अशी परिस्थिती दिसते आहे.