शिवप्रहार न्यूज -शिवप्रहार संघटनेच्या कार्यालयाला धर्मतपस्वी कालीचरण महाराज यांची सदिच्छा भेट ... 

शिवप्रहार न्यूज -शिवप्रहार संघटनेच्या कार्यालयाला धर्मतपस्वी कालीचरण महाराज यांची सदिच्छा भेट ... 

शिवप्रहार संघटनेच्या कार्यालयाला धर्मतपस्वी कालीचरण महाराज यांची सदिच्छा भेट ... 

श्रीरामपूर - भारतातील सर्व युवा पिढीतील महादेव भक्तांच्या गळ्यातील ताईत असलेल्या कालीचरण महाराज यांनी आज 18 जून रोजी शिवप्रहार संघटनेच्या बजरंगनगर,बेलापूर रोड,श्रीरामपूर येथील कार्यालयाला अर्धा तासाची भेट दिली.

         कालीचरण महाराज हे शिव तांडव,स्त्रोत करीता भारतभर प्रसिद्ध आहे.अनेक हिंदी न्यूज चैनल वरील डिबेट मध्ये ते सहभागी होत असतात. अनेक मराठी न्यूज चैनल वर देखील त्यांचे धर्म कार्यक्रम झालेले आहेत.    

          आज कालीचरण महाराज संभाजीनगर येथून नाशिककडे जात असतांना त्यांनी श्रीरामपूर शहरातील सिद्धिविनायक मंदिर येथे भेट दिली. त्यानंतर ते थेट “शिवप्रहार प्रतिष्ठान” संघटनेच्या बजरंगनगर, बेलापूर रोड येथील कार्यालयात सदिच्छा भेट देण्यासाठी आले. 

        त्यावेळी त्यांचे स्वागत शिवप्रहारचे प्रमुख श्री. एस.एम.आगे यांनी केले. यावेळी कालीचरण महाराज यांनी शिवप्रहारचे प्रमुख एस.एम.आगे व शिवप्रहार चे कार्याध्यक्ष चंद्रशेखर आगे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तसेच संघटनेच्या छ.शिवाजी चौकात शिवपुतळा बसवणे,श्रीरामपुरातील लव्ह जिहादचा डाव हानुण पाडणे अशा कार्याबद्दल माहिती घेऊन शिवप्रहार चे कौतुक केले. तसेच संघटनेला पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊन कधीही काही अडचण आल्यास पूर्ण सहकार्य करण्याचा शब्द दिला. 

          यावेळी हिंदूराष्ट्र सेनेचे सचिन दोंडकर,किरण जगताप,राहुल अस्वले,पंकज शेळके,रविराज बेलदार, राजेंद्र पठाडे,प्रशांत भोसले, योगेश बोराडे,संतोष चव्हाण,गणेश माळवे, लवकेश बोरा,दीपक संत, महेश मंडलिक,मयुर फिंपाळे,बंटी बाजारे, शिर्या शिंदे,पप्पू भोसले, गुरु आगे, युवराज आगे,यश शेळके,दर्शन कुर्हे,ओंकार जाधव,भैय्या बिडवे,चैतन्य परदेशी,कल्पेश शर्मा,गौतम तायड,सागर शेळके,रोशन मोरे,किशन ताकटे,सुरज यादव,भगवान बोंबले,किरण सोनवणे,पप्पशेट कडुस्कर,देवा दातार,किसन पोकळे,संतोष भालेकर,दिलीप शेळके इत्यादी उपस्थित होते.