शिवप्रहार न्यूज- आज श्रीरामपूर शहरातील लॉजमध्ये फुगलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला…

आज श्रीरामपूर शहरातील लॉजमध्ये फुगलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला…
श्रीरामपूर- श्रीरामपूर शहरातील हॉटेल दत्तभवन च्या मागील बाजूस असलेल्या सूर्या लॉजमध्ये आज बुधवार दिनांक 23 मार्च 2022 रोजी पुरुष जातीचा मृतदेह फुगलेल्या व काही प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.
याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ला खबर दिल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.त्यावेळी हा मृतदेह लॉजच्या खोलीमध्ये कॉटवर शर्ट आणि पॅंट शिवाय फक्त अंडर पॅन्ट वर उताणा पडलेला पडलेल्या अवस्थेत दिसून आला.या मृतदेहाचा चेहरा काळा पडलेला व कुजलेला होता.चेहर्यावर मोठी पांढरी दाढी आहे.या मृतदेहाच्या शेजारी एक पाण्याची बाटली व पाकीट आढळून आले.
हा नेमका घातपाताचा प्रकार आहे? का आत्महत्येचा प्रकार आहे याबाबत श्रीरामपूर पोलिसांकडून पुढील तपास चालू आहे.हा मृतदेह मुंबई येथील उमर शेख नावाच्या इसमाचा असल्याचे पोलिसांकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी सांगितले. उमर शेख हा ४ दिवसापासून सूर्या लॉजवर राहत होता.