शिवप्रहार न्यूज- हिंदु मुलीला पळवुन श्रीरामपुरला आणणाऱ्या अतीक शेखचा “डाव” शिवप्रहार प्रतिष्ठाण ने हाणुन पाडला...
हिंदु मुलीला पळवुन श्रीरामपुरला आणणाऱ्या अतीक शेखचा “डाव” शिवप्रहार प्रतिष्ठाण ने हाणुन पाडला...
श्रीरामपूर - याबाबतची हकीकत अशी की,श्रीरामपूर शहरातील डावखर वस्ती ,वार्ड -०७ परिसरात एका तरुणाने नगर येथील अतिक एजाज अकबर शेख,रा-नगर याला आश्रय दिला असुन अतिक शेख याने नगर तालुक्यातील एका हिंदु मराठा समाजाच्या मुलीला पळवून आणले आहे. ती मुलगी अतिक शेख सोबत डावखर वस्ती येथे आहे. ही बाब शिव प्रहार प्रतिष्ठानच्या चंद्रशेखर(चंदू)आगे,प्रशांत आजगे,प्रमोद कुऱ्हे,रितेश चव्हाणके,सागर ठोंबरे यांना जागृत नागरिकांकडुन समजताच त्यांनी डावखर वस्ती येथे जाऊन या प्रकरणाची शहानिशा केली असता त्यामध्ये सत्यता आढळल्याने शिवप्रहारच्या मावळ्यांनी अतिक शेख चा “श्रीरामपुर स्टाईलने पाहुणचार “ केला व तात्काळ श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक श्री.वांडेकर यांना याठिकाणी पाचारण करण्यात आले. त्यांनी चौकशी केल्यानंतर असे समजले की,या मुलीच्या वडिलांनी ही मुलगी हरवल्या बाबत नगर तालुका पोलीस स्टेशन मध्ये मिसिंग तक्रार क्रमांक २५/२०२१ प्रमाणे मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली आहे. त्यावरून चंद्रशेखर(चंदू) आगे यांनी तात्काळ मुलीच्या वडिलांचा संपर्क शोधुन काढुन त्यांना संपर्क केल्याने मुलीचे वडील व या मिसींग चा तपास करणारे नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार श्री.ससाणे हे श्रीरामपुरात आले आणि श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला नोंद करून त्यांच्या मुलीला ताब्यात घेऊन ते नगरला निघुन गेले. नगर येथुन हिंदु मुलीला फुस लावुन पळवुन श्रीरामपुरात आणणारा आरोपी अतिक शेख याला श्रीरामपूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून श्रीरामपूर पोलीस पुढील कार्यवाही करीत आहे.
तरी हा प्रकार लव्ह जिहादसम असून मराठा समाजातील हिंदु तरुणीला पळवणारा अतिक शेख याला या प्रकरणात श्रीरामपूरच्या ज्या तरुणाने मदत केली आहे त्या तरुणाने देखील हिंदू तरुणीशी विवाह केलेला असून विवाहानंतर त्याने त्या हिंदु तरुणीला मुस्लीम बनवलेले आहे. अतिक शेख याने नगर वरुन पळवून आणलेल्या हिंदु मुलीला देखील असेच “लव्ह जिहाद “करुन विवाहानंतर मुस्लीम बनवण्याचा त्यांचा डाव होता. त्यांचा हा डाव शिवप्रहार प्रतिष्ठानच्या मर्द मावळांनी यशस्वी होवु दिला नाही.
लव्ह जिहाद रोखण्यासाठी उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश सह काही राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदे बनले असुन महाराष्ट्रात देखील असा कायदा होणे खुप आवश्यक आहे. तरी आपल्या श्रीरामपुरात असा लव्ह जिहादसम प्रकार कुठे आढळला तर तात्काळ शिवप्रहार प्रतिष्ठान या संघटनेला कळवावे; त्या प्रकाराविरोधात शिवप्रहार संघटना खंबीर भुमिका घेईल असे आवाहन शिवप्रहार प्रतिष्ठानचे चंद्रशेखर (चंदू)आगे यांनी केले आहे .