शिवप्रहार न्यूज - तिजोरीतून ९॥ लाखाची रोकड चोरी !माळवडगाव रोडवर एकाच्या खुनाचा प्रयत्न !! 

शिवप्रहार न्यूज - तिजोरीतून ९॥ लाखाची रोकड चोरी !माळवडगाव रोडवर एकाच्या खुनाचा प्रयत्न !! 

तिजोरीतून ९॥ लाखाची रोकड चोरी !माळवडगाव रोडवर एकाच्या खुनाचा प्रयत्न !! 

श्रीरामपूर /नगर (शिवप्रहार न्यूज ) नगर - संभाजीनगर (औरंगाबाद ) रस्त्यावर असलेला विठ्ठल हायवे पेट्रोल पंप येथे पेट्रोल पंपाच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने दुपारी तीन ते रात्री च्या दरम्यान वेळ नक्की नाही तेथे घुसून तिजोरी फोडून तिजोरीतील नऊ लाख 63 हजाराची रोकड चोरून नेली.

     या प्रकरणी पेट्रोल पंपाचा मॅनेजर संदीप भाऊसाहेब गवते ,राहणार -मोरे चिंचोरे, तालुका नेवासा यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस भादवि कलम 457 ,380 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि आठरे यांनी घटनास्थळी भेट दिली.पोसई हंडाळ हे पुढील तपास करीत आहे.

     दुसऱ्या घटनेत श्रीरामपूर तालुक्यात खानापूर ते माळवाडगाव रस्त्यावर सायंकाळी ६:३० वाच्या सुमारास बोधक वस्ती जवळ साहेबराव भीमराज कर्पे ,वय 53 ,राहणार -खानापूर रोड,माळवाडगाव यांना तीन जणांनी गज ,चाकू ,लाथा बुक्क्याने बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.जखमी करपे यांनी श्रीरामपूर तालुका पोलिसात फिर्याद दिल्यावरून आरोपी सुनील उर्फ संदीप गौतम वाळेकर ,राहणार -भामाठाण तेजस उमेश मोरे ,सुजित अनिले लासणे दोघे राहणार -माळवडगाव यांच्याविरुद्ध भादंवि कलम 307 ,323 ,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी डीवायएसपी मिटके ,सपोनि थोरात यांनी भेट दिली.

     फरार आरोपींचा पोसई बोरसे हे शोध घेत आहे ही मारहाण नेमक्या कोणत्या कारणाने झाली हे समजू शकलेले नाही .