शिवप्रहार न्यूज- सरला बेटावर वाळुतस्करांकडुन वाळु होत आहे फस्त,प्रशासन मात्र लॅाकडाऊन अंमलबजावणी मध्ये आहे व्यस्त; ग्रामस्थांची जिल्हाधिकारींकडे तक्रार...

सरला बेटावर वाळुतस्करांकडुन वाळु होत आहे फस्त,प्रशासन मात्र लॅाकडाऊन अंमलबजावणी मध्ये आहे व्यस्त;
ग्रामस्थांची जिल्हाधिकारींकडे तक्रार...
श्रीरामपूर – तालुक्यातील सराला येथील गोदावरी नदीपात्रातून होणारा बेकादेशीर वाळू उपसा त्वरित थांबवावा व वाळू तस्करांकडून ग्रामस्थांना होणारी दमबाजी याबाबत मह्सूल विभाग व पोलीस विभागाने लक्ष घालावे अशी मागणी सराला ग्रामपंचायतचे सरपंच शंकर विटेकर, उपसरपंच रेवणनाथ औताडे व ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे .
निवेदनात असे नमुद केले आहे की, सराला येथील गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीपणे मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. त्याचबरोबर ग्रामस्थांना व पदाधिकार्यांना वाळूतस्कारांकडून दमबाजी व धमकी दिली जात असल्याने सराला गावात भीतीचे वातावरण पसरले आहे .
जिल्हाधिकारी तसेच प्रांतधिकारी अनिल पवार , तहसीलदार प्रशांत पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदींना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सराला गावामधील गोदावरी नदीपात्राच्या ठिकाणी ग्रामपंचायत नळ पाणीपुरवठा योजनेची विहीर व इतर शेतकर्यांच्या शेतीपूरक विहिर आहेत . सध्या कोरोना रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने शासनाच्या लॉकडाऊनचे सराला ग्रामस्थ कसोशीने पालन करीत आहे. अशा परिस्थितीत सर्व शासकीय यंत्रणा व पोलीस प्रशासन लोकडाउनच्या अंमलबजावणीमध्ये व्यस्त असून याच परिस्थितीचा गैरफायदा घेवुन परिसरातील वाळू तस्करांनी सराला हद्दीतील जुने गावठाण लगतच्या गोदावरी नदीपात्रातून रात्री-अपरात्री जेसीबी माशिन, डम्पर व ट्रक्टरच्या सहाय्याने बेसुमार वाळूचोरी सुरु केली आहे. सततच्या वाळू उपशाने ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठा योजनेची व शेतकर्यांच्या विहिरींचे पाणी जाण्याची शक्यता निर्माण झाली असून एन उन्हाळ्याच्या तोंडी गावास पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे या निवेदनात सरला ग्रामस्थांनी म्हटले आहे .