शिवप्रहार न्यूज- कोरोनामुळे ०२ वर्षांनंतर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी मंगळवारी श्रीरामपुरात…

कोरोनामुळे ०२ वर्षांनंतर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी मंगळवारी श्रीरामपुरात…
श्रीरामपूर- श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरला जाणाऱ्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखीचे मंगळवार दि. २१ जून रोजी दुपारी १२:३० वा श्रीरामपूर संगमनेर रस्त्यावरील जून्या जकात नाक्याजवळ आगमन होणार असल्याची महिती दिंडी व पालखी समितीच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार रमेश कोठारी यांनी दिली.
बेलापूर रोडवरील “शिवप्रहार प्रतिष्ठान”च्या कार्यालयासमोर बजरंगनगर येथे बेलापूर रोड मित्र मंडळाच्या वतीने या पालखीतील वारकरी भाविकांना तब्बल ०५ हजार लाडू-चिवडा प्रसादाचे वाटप करण्यात येणार असल्याचे पै.चंद्रशेखर(चंदू)आगे यांनी सांगितले.
दोन वर्ष कोरोनामुळे पालखी व दिंडी काढण्यास शासनाने प्रतिबंध केला होता. या वर्षी परवानगी दिल्यामुळे वारकरी संप्रदायात व विठ्ठल भक्तात उत्साहाचे वातावरण आहे. पालखीचे नेतृत्व सुरेश महाराज गोसावी, मोहन महाराज बेलापूरकर, पालखी समितीचे अध्यक्ष आदी करीत आहेत.
संतश्रेष्ठ निवृत्ती महाराजांचे पालखीचे स्वागतासाठी आ. लहू कानडे, प्रांताधिकारी अनील पवार, तलासीलदार प्रशांत पाटील, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे सर्व माजी नगरसेवक, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, बाजार समितीचे प्रशासक संदीप रुद्राक्ष, सचिव किशोर काळे, मर्चंट असोशियनचे अध्यक्ष राहुल मुथा, उपाध्यक्ष राहुल कोठारी, सेक्रेटरी प्रेमचंद कुंकुलोळ, सहसेक्रेटरी निलेश बोरावके, हमाल, मापाडी संघाचे सर्व सदस्य, अडत व्यापारी, कांदा व्यापारी, भाजीपाला विक्रेते आदींसह अनेक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
संत निवत्तीनाथांची पालखी श्रीराम मंदिरात आल्यानंतर तेथे श्रीराम मंदीर विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षा प्रणिता गिरमे व विश्वस्त मंडळ तसेच अशोक उपाध्ये, गौतम उपाध्ये, भगवान उपाध्ये व उपाध्ये परिवाराच्यावतीने पालखीची पूजा होणार आहे. त्यानंतर व्यापारी, शेतकरी व हमाल मापाडी व नागरिक यांच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांना प्रसादाचे भोजन देण्यात येणार आहे. पालखी व दिंडीच्या स्वागतासाठी भक्तांनी व नागरिकांनी विविध मंडळाच्या कार्यकर्त्यांनी, भजनी मंडळ, महीला भजनी मंडळ आदींनी सहभागी व्हावे असे आवाहन पालखी समितीच्यावतीने करण्यात आले आहे.