शिवप्रहार न्यूज-भेंडा गोळीबार पोरीच्या मॅटर वरुन झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न ; दहा आरोपींना अटक...
भेंडा गोळीबार पोरीच्या मॅटर वरुन झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न ; दहा आरोपींना अटक...
नेवासा(प्रतिनिधी)- तीन दिवसांपूर्वी घडलेल्या भेंडा गोळीबार प्रकरणी नेवासा पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली असून जखमी फिर्यादीच्या मित्रांनीच या प्रकरणात बनाव केला असल्याचे पुढे आले आहे. या गुन्ह्यात १० सराईत आरोपींना अटक केली असल्याचे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी पत्रकारांना सांगितले.
याप्रकरणी पोलीस निरीक्षक विजय करे म्हणाले की दि.०२/०५ / २०२१ रोजी नेवासा तालुक्यातील भेंडा येथे सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाल्याने खळबळ उडाली होती.यातील जखमी सोमनाथ तांबे याने फिर्याद दिल्यावरुन नेवासा पोलिस स्टेशनला खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. सदरवेळी घटनास्थळाला श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलिस अधिक्षक डॉ.दिपाली काळे,उपविभागीय पोलिस अधिक्षक सुदर्शन मुंढे,पोलिस निरीक्षक विजय करे ,सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकुर,उपनिरीक्षक भरत दाते यांनी भेट देवुन तपास सुरू केला होता.
पोलिसांना तपासात पुढे असे समजले की,सदर गुन्ह्याची फिर्याद ही फिर्यादी तांबे व त्याचे मित्र यांनी खोटा बनाव करुन सूडबुद्धीने पप्पू जावळे व पुंड यांना अडकवण्यासाठी दिली आहे असा पोलिसांना संशय आल्याने पोलिस निरीक्षक करे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथकांनी वेगवेगळे पध्दतीने गतीमान तपास सुरु केला. पोलिसांनी २४ तासात ५० पेक्षा जास्त साक्षीदाराकडे गुन्ह्याचे हकीगत बाबत चौकशी केली परंतु पालिसांना झालेल्या घटनेबाबत संशय येत होता. अखेर पोलिसांनी अतिशय सुक्ष्म तपास करुन गोळीबार करणारे आरोपी यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबत सत्य घटना अशी की,यातील फिर्यादी सोमनाथ तांबे हा त्याचा मित्र स्वप्नील बोधक याचेकडे व्हॉलीबॉल खेळण्यासाठी सायंकाळी ७. ३० च्या सुमारास आला होता. त्याचवेळी त्यांचा मित्र शुभम विश्वनाथ गर्जे रा.वडुले हा देखील त्या ठिकाणी आला. पोरीच्या मॅटरवरुन शुभम विश्वनाथ गर्जे याने त्याचे गुन्हेगार मित्र अमोल राजेंद्र शेजवळ, अमोल अशोक गडाख,अक्षय रामदास चेमटे यांना बोलावून घेतले. शुभम गर्जे त्या तिघांना व्हॉलिबॉल खेळत असलेल्या मैदानावर घेवुन आला शुभम विश्वनाथ गर्जे, स्वप्नील बाबासाहेब बोधक,अमोल अशोक गडाख,अक्षय रामदास चेमटे,अमोल राजेद्र शेजवळ,सोमनाथ तांबे हे लांडेवाडी ,भेंडा येथील मैदानावर सायंकाळी हजर असताना त्यातील अक्षय चेमटे याने मुलीचे कारणावरून त्याच्या हातातील गावठी पिस्तुलातुन सोमनाथ तांबे याच्या छातीवर गोळी मारली त्यात सोमनाथ तांबे जखमी होवुन खाली कोसळला. त्यावेळी वरील सर्वांनी कट करुन यातील अमोल अशोक गडाख,अक्षय चेमटे,अमोल शेजवळ यांना गावठी कट्यासह पळवून लावले.सोमनाथ तांबे यास पप्पू जावळे व गणेश पुंड यांनी गोळीबार केला असे खोटे नाव सांगण्यास सांगितले व पोलिसांची दिशाभुल केली परंतु तपासाअंती सदरचा गोळीबार अमोल अशोक गडाख, अक्षय रामदास चेमटे,अमोल राजेद्र शेजवळ यांनी केला व यातील आरोपी शुभम विश्वनाथ गर्जे रा.वडुले ,स्वप्नील बाबासाहेब बोधक रा.लांडेवाडी,भेंडा यांनी खोटा बनाव करुन दिशाभुल केली व आरोपींना पळवून लावले.
वरील सर्व १० आरोपींना नेवासा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथकांनी वेगवेगळया ठिकाणावर जाऊन आरोपींना अटक केली असुन त्यांचेकडून गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटारसायकल गावठीकट्टा पिस्तोलासह जिवंत काडतुसे जप्त केली आहे .
नगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.दिपाली काळे,उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजय करे , सपोनि विजय ठाकुर,उपनिरीक्षक भरत दाते,पोलीस नाईक राहुल यादव,महेश कचे,सुहास गायकवाड,पो.कॉ. वशिम इनामदार,गणेश इथापे, पोका गुंजाळ यांनी तपास कामगिरी केली.