शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात कॉलेज प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांना मनस्ताप...
श्रीरामपुरात कॉलेज प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांना मनस्ताप...
श्रीरामपूर -श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे असलेल्या अजितदादा पवार कॉलेजमध्ये परिसरात मोटरसायकलींच्या बेशिस्त पार्किंगमुळे ग्रामस्थांनी मोठा मनस्ताप होत आहे.
अधिक माहिती अशी की,वडाळा महादेव येथील अजितदादा कॉलेजच्या शेजारून उघडे वस्ती ते वडाळा महादेव गाव हा रस्ता जात असून या कॉलेजला येणारे विद्यार्थी या रस्त्यात गाड्या लावतात.तसेच कॉलेज प्रशासनाचे देखील लोक येथे गाड्या लावतात.यामुळे या भागातून येणार्या जाणार्या ग्रामस्थांना प्रचंड मनस्ताप व त्रास होत आहे अशी तक्रार ग्रामस्थ करत आहे.
तसेच जर कॉलेज प्रशासनाने या रस्त्यावर गाड्या पार्क करणे थांबवले नाही तर या गाड्यांचे नुकसान करण्यात येईल असा इशारा काही संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.