शिवप्रहार न्यूज- शिर्डीत चोरी करताना श्रीरामपूरातील एकाला पकडले; एक पळाला…

शिवप्रहार न्यूज- शिर्डीत चोरी करताना श्रीरामपूरातील एकाला पकडले; एक पळाला…

शिर्डीत चोरी करताना श्रीरामपूरातील एकाला पकडले; एक पळाला…

शिर्डी- श्रीसाईबाबा समाधी मंदिर गेटजवळ परप्रांतीय महिलेजवळील पर्स सामान चोरताना श्रीरामपुरातील शेख नावाच्या आरोपीस पकडण्यात आले तर दुसरा शेख नावाचा आरोपी फरार झाला. यामुळे पुन्हा एकदा श्रीरामपूर परिसरातीलच गुन्हेगार शिर्डीत येवून चोरी करतात हे उघड झाले आहे. मागेही असे प्रकार उघड झाले आहेत. 

      याबाबत शिर्डी पोलीस सूत्रांनी सांगितलेली माहिती अशी की, श्रीसाईबाबा समाधी मंदिर गेट नं. १ येथे काल ९.३० च्या सुमारास अंकिताबेन देवेंद्रभाई कोंकती, ही अहमदाबादची महिला चप्पल काऊंटर येथे रांगेत चप्पल ठेवण्यासाठी उभी असताना तिच्या मागे असलेला आरोपी शेख व दुसरा आरोपी शेख यांनी सदर महिलेच्या गळयातील अडकविलेल्या पर्सची चैन उघडून पर्समधील छोटी हॅन्डपर्स चोरून नेली. त्यात चेकबुक, बँकेची कागदपत्रे, क्रेडीटकार्ड, १ लाख रूपयांच्या सोन्याच्या अंगठया, हिऱ्याची अंगठी, ७ हजार रूपयांची रोकड असा ऐवज होता. 

      अंकिताबेन देवेंद्रभाई कोंकती या तरूणीने शिर्डी पोलिसात फिर्याद दिल्यावरून पकडलेला आरोपी अतील आयुब शेख, रा.श्रीरामपूर, शाहरूख इस्मान शेख, रा.श्रीरामपूर यांच्याविरूद्ध शिर्डी पोलिसात भादंवि कलम ३७९ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दातरे हे फरार दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. पकडलेल्या आरोपीकडून अनेक चोऱ्यांचा उलघडा होण्याची शक्यता शिर्डी पोलिसांनी वर्तवली.