शिवप्रहार न्यूज- मेनरोडवरील वाचनालयातील स्वच्छतागृहामध्ये महिलांना लघुशंकेला जाण्यापासून रोखले...

शिवप्रहार न्यूज- मेनरोडवरील वाचनालयातील स्वच्छतागृहामध्ये महिलांना लघुशंकेला जाण्यापासून रोखले...

मेनरोडवरील वाचनालयातील स्वच्छतागृहामध्ये महिलांना लघुशंकेला जाण्यापासून रोखले...

 श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील मेनरोडवर असणाऱ्या लोकमान्य टिळक वाचनालय या टोलेजंग इमारती मध्ये वाचनालय,अभ्यासिका,व्यायामशाळा, हॉल इत्यादी विभाग आहेत.या ठिकाणी दररोज अनेक नागरिकांची वर्दळ असते.येथे पुरुष व महिला असे दोन स्वतंत्र स्वच्छतागृह आहेत.येणारे नागरिक त्याचा वापर करतात.

          आज काही महिला या ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहामध्ये लघुशंकेसाठी जात असताना वाचनालयातील कर्मचार्यांनी त्यांना अडवले.तसेच येण्यास मज्जाव करून या महिलांना पोलिस कारवाई करण्याची धमकी वाचनालयातील काही कर्मचाऱ्यांनी दिली.

          खरंतर एक लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या श्रीरामपूर शहरांमध्ये महिलांसाठी फक्त एक स्वच्छतागृह आहे.मेनरोडवर अनेक महिला या मार्केट मधील दुकानांमध्ये कर्मचारी म्हणून काम करतात.परंतु या ठिकाणी स्वच्छतागृह नसल्याने या महिलांची मोठी कुचंबणा होते.काही महिलांना गैरसोयीमुळे वाचनालयाच्या मागील मोकळ्या जागेमध्ये उघड्यावर लघुशंकेसाठी जावे लागते.ही खूप मोठी शोकांतिका आहे.

           त्यातच वाचनालयातील कर्मचाऱ्यांकडून काही महिलांना अशी वागणूक मिळाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.श्रीरामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद एक महिला भूषवत असून त्यांच्याच अखत्यारीत हे वाचनालय येते.त्यामुळे नगराध्यक्षा या प्रश्नामध्ये तातडीने लक्ष घालून आमची होणारी कुचंबणा रोखतील व आम्हाला न्याय देतील अशी अपेक्षा या महिलांनी व्यक्त केली आहे. 

        आज 26 ऑगस्ट रोजी महिला समानता दिन पाळला जातो.याच दिवशी असा निंदनीय प्रकार श्रीरामपुरात वाचनालयामध्ये घडला आहे.