शिवप्रहार न्यूज- कोरोना पेशंटची बॉडी ताब्यात दिली नाही म्हणून डॉक्टर जाधव यांना मारले...

शिवप्रहार न्यूज- कोरोना पेशंटची बॉडी ताब्यात दिली नाही म्हणून डॉक्टर जाधव यांना मारले...

कोरोना पेशंटची बॉडी ताब्यात दिली नाही म्हणून डॉक्टर जाधव यांना मारले...

नगर- नगर शहरातील पॅसिफिक कोवीड सेंटर ,स्वस्तिक चौक , नगर या कोवीड सेंटर मधील प्रमुख डॉक्टर श्री. प्रशांत प्रभाकर जाधव ,वय ३० वर्षे यांना एका कोरोनामुळे मयत झालेल्या पेशंट ची बॉडी लवकर ताब्यात दिली नाही या कारणामुळे मयताचे नातेवाईक ०१)संजीवन जाधव ,०२) आकाश डोके व इतर दोन अनोळखी व्यक्ती राहणार- जामखेड यांनी डॉक्टर श्री. जाधव यांना घाणघाण शिवीगाळ करून मारहाण केली आणि तुला पाहुन घेईन अशी धमकी दिली म्हणुन कोतवाली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र वैद्यकीय सेवा अधिनियमातील कलमाखाली गुन्हा रजि.नं.३३८/२०२१ दाखल करण्यात आला आहे.

             जोपर्यंत कोरोना पेशंटचे बील येत नाही तोपर्यंत पेशंट किंवा डेड बॅाडी ला जावु द्यायचे नाही असे प्रकार राज्यात घडल्याने त्याविरोधात सरकारने परिपत्रक काढले होते.होते.अशा कारणामुळेच डॅाक्टरला मारहाण झाल्याची चर्चा आहे.