शिवप्रहार न्यूज- मुल्ला कट्टर विरोधात अजून एक गंभीर गुन्हा दाखल;सामूहिक बलात्कार व वेश्या व्यवसायाचे प्रकरण…
मुल्ला कट्टर विरोधात अजून एक गंभीर गुन्हा दाखल;सामूहिक बलात्कार व वेश्या व्यवसायाचे प्रकरण…
श्रीरामपूर - गेल्या महिन्यात दहा दिवसापूर्वी श्रीरामपूर शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार इमरान युसुफ कुरेशी उर्फ मुल्ला कटर,वय-३५,राहणार -नवी दिल्ली,वार्ड नंबर दोन,श्रीरामपूर याच्या विरोधात एका अल्पवयीन हिंदू मुलीला बळजबरीने धर्मांतरित करून बलात्कार करणे या संदर्भातला गुन्हा दाखल झाला होता.या प्रकरणात श्रीरामपूर पोलिसांनी मुला कट्टर याला तात्काळ अटक केली होती.या गुन्ह्याचा तपास कर्तव्यदक्ष डीवायएसपी श्री.संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असतानाच मुल्ला कट्टर यांच्या विरोधात आज दिनांक 01 ऑगस्ट 2022 रोजी पहाटेच्या सुमारास अजून एक गंभीर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,एका अठरा वर्ष अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार करणे,मुलीचे अपहरण करून गाडीत बसून तिला पांढरीपुल येथे नेऊन वेश्या व्यवसाय चालवणारा बाबा चेंडवाल याला विकणे, तेथे तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणे व शेवगाव येथे देखील तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणे असा एकंदर हा सगळा प्रकार आहे. याप्रकरणी 18 वर्षीय तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपी इमरान युसुफ कुरेशी उर्फ मुल्ला कटर,पप्पू /प्रशांत गोरे,बाबा चेंडवाल व एक महिला आणि तिचा भाऊ यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक 666/2022 प्रमाणे भारतीय दंड संहिता व पोक्सो कायद्यातील कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पीएसआय सुरेखा देवरे या पो.नि.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.