शिवप्रहार न्यूज- लाज वाटते आता तुला श्रीरामपुरकर म्हणायची !!!  कोरोना काळात झहीर खानला उद्देशुन एका खेळाडुची भावनिक पोस्ट सोशल मेडीयावर व्हायरल...

शिवप्रहार न्यूज- लाज वाटते आता तुला श्रीरामपुरकर म्हणायची !!!  कोरोना काळात झहीर खानला उद्देशुन एका खेळाडुची भावनिक पोस्ट सोशल मेडीयावर व्हायरल...

लाज वाटते आता तुला श्रीरामपुरकर म्हणायची !!! 
कोरोना काळात झहीर खानला उद्देशुन एका खेळाडुची भावनिक पोस्ट सोशल मेडीयावर व्हायरल...


श्रीरामपूर- 
श्रीरामपूरचा भमिपुत्र झहीर खान ने दिलदारपणा ,दानशुरपणा दाखवुन या कोरोना संकटात अडकलेल्या श्रीरामपूर करांना मदत करावी यासाठी भावनिक साद एका झहीरच्या काळातील त्याच्या समवयस्क खेळाडुने केली आहे. आपले नाव मात्र या खेळाडुने गलदस्त्यात ठेवले असुन श्रीरामपुरात क्रिकेट अकादमी उघडण्याचे शब्द झहीरने पाळला नाही आता आपल्या श्रीरामपुरच्या मातीचे कर्ज फेडायची वेळ आली आहे झहीर....अशा आशयाची या क्रिकेटवेड्या खेळाडुची पोस्ट सोशल मेडीयावर व्हायरल होत आहे.

ती पोस्ट जशीच्या तशी शिवप्रहार न्युज च्या वाचकांसाठी खाली देत आहोत.

लाज वाटते आता तुला श्रीरामपूरकर म्हणायची...!

श्रीरामपूरात तालुक्यात COVID मुळे भीषण मृत्यू तांडव असतांना, सर्वत्र रूग्ण, रोगराई, ऑक्सीजन, इंजेक्शन,औषधांचा तुटवडा असतांना एकमेव आशेचा किरण म्हणून आर्त हाक जहीर तुला सर्व श्रीरामपूरकर आपल्या लाडक्या भुमिपुत्रास (श्रीरामपुर भुषण पुरस्करार्थी )करत आहे. 
ज्या वेळी तुझाच सहयोगी खेळाडु मुनाफ पटेल त्याच्या गुजरात मधील ईखर या स्वगावी कोरोनाच्या साथीशी लढा देतांना स्वखर्चाने कोव्हीड सेंटर मध्ये गावकर्यांची सेवा करीत आहे. माणुस कितिही मोठा झाला तरी त्याची मायभूमी कधी विसरत नाही यामुळेच GOOGLE  चे CEO श्री. सुंदर पिचाई यांनी भारतभूमीला 135 कोटी रुपयेची आर्थिक मदत केली, MICROSOFT चे CEO श्री सत्या नडेला यांनीही कोटीची वैद्यकीय मदत केली. याही पेक्षा परका असतांनाही केवळ भारतात खेळतांना दुःख बघवले गेले नाही म्हणून ऑस्ट्रेलियाचा खेळाडू पॅट कमीन्स याने ३५ लक्ष रूपये ची PM फंडात मदतनिधी दिला आणि जहीर तु ज्या मातीत क्रिकेटचा सराव केला,संगोपन,शिक्षण केले त्या मातीच कर्ज फेडायची हिच वेळ आहे जहीर तु श्रीरामपूर करांना दिलेला शब्द  क्रिकेट ॲकॅडमी तर ऊघडु शकला नाही ,तुला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्या वेळी एक राजकीय कार्यक्रम म्हणून तु आला नसशील हेही आम्ही समजून घेतले. परंतु तु खर्या अर्थाने श्रीरामपूर कराच्या सुखं दुःखात सामील झालाच नाही हेच दुःख वाटते, श्रीमपूरच्या तरूण खेळाडूंचे भविष्य घडवु शकला नाहीस ,निदान तरुणांचे जिवन उध्वस्त होण्या पासुन थांबवू तर नक्कीच शकतोस.

एक तत्कालीन समवयस्क क्रिकेटवेडा खेळाडू 
(खेळाडू मित्रांच्या प्रतिक्रिया अपेक्षीत)