शिवप्रहार न्यूज- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त युवकांनी केले रक्तदान.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त युवकांनी केले रक्तदान...
श्रीरामपूर-सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असताना समाजाप्रती आपले काही देणे लागते या भावनेतून आज तरुण रक्तदान करीत आहेत. छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त अखिल भारतीय छावाच्या वतीने आयोजित केलेले रक्तदान शिबिर म्हणजे महापुरुषांच्या विचारांचे अनुकरणच आहे अशा शब्दात श्रीरामपूरचे पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
छावा जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांच्या पुढाकाराने छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त छावा च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन श्री.मिटके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. तसेच यावेळी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सानप, ॲड. सुभाष जंगले, ॲड. संदीप चोरमल,साई मंदिर ट्रस्ट चे विजय शिंदे, डॉ. ओम जोंधळे आदी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलतांना पटारे म्हणाले, लवकरच १८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांसाठी लसिकरण सुरू होणार आहे आणि याच वयोगटातील तरुण वर्ग मोठ्याप्रमाणात रक्तदान करतो. कोविड लसीकरण झाल्यानंतर मात्र तीन महिने रक्तदान करता येत नाही. त्यामुळे भविष्यात रक्ताचा मोठा तुटवडा भासू शकतो ही बाब लक्षात घेत आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. हे शिबीर 6 जून शिवराज्यभिषेक दिनापर्यंत शहरातील नित्यसेवा रक्तपेढीत सुरू राहणार आहे.
ज्यांना रक्तादानाच्या या महान कार्यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी संपर्क करावा, असे आवाहन पटारे यांनी केले.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी शरद बोंबले, दौलत गायकवाड, मच्छिंद्र गायकवाड, राहुल तारक, निलेश पटारे, योगेश काळे, भारत देसाई, किरण शिंदे, रवींद्र कापसे, संजय शहा, शुभम दांगट, विजय तेलोरे, महेश चव्हाण, अक्षय झिने, डांगे पाटील, गणेश धुमाळ, प्रदीप पटारे, बळीराम भिसे, गणेश बोंबले, निलेश बनकर, सुभाष कापसे,अक्षय पटारे आदी उपस्थित होते.