शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूरातील कांबळेंनी नेपाळमधील एव्हरेस्ट बेस कॅम्प वर फडकावला शिवछत्रपतींचा भगवा...

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूरातील कांबळेंनी नेपाळमधील एव्हरेस्ट बेस कॅम्प वर फडकावला शिवछत्रपतींचा भगवा...

श्रीरामपूरातील कांबळेंनी नेपाळमधील एव्हरेस्ट बेस कॅम्प वर फडकावला शिवछत्रपतींचा भगवा...

 श्रीरामपूर- हिमालय पर्वतरांगांमध्ये वसलेल्या नेपाळमधल्या माऊंट एव्हरेस्ट या जगातील सर्वांत उंच शिखराच्या बेस कॅम्प वर श्रीरामपूरातील तरुणाने शिवछत्रपतींचा भगवा ध्वज फडकावुन पराक्रम केला आहे. शहरातील दळवी वस्ती मोरगे हॉस्पिटल परिसरात राहणारे श्री.सुनील विलास छाया कांबळे यांनी जगातील सर्वोच्च शिखर असलेले माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प नुकताच सर केलेला आहे. माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करणे म्हणजे जवळपास माऊंट एव्हरेस्ट सर करण्याची 60% मोहीम पूर्ण करणे होय. 21 एप्रिल 2021 रोजी नेपाळची राजधानी काठमांडू येथून श्री. सुनील विलास छाया कांबळे यांनी एव्हरेस्ट मोहिमेला सुरुवात केली. त्यानंतर विविध टप्पे पार करून तसेच कोरोना आणि वैद्यकीय संदर्भातील इतर चाचण्या यांची पूर्तता करून सुनील कांबळे दिनांक 1 मे 2021 रोजी माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प (उंची पाच हजार 364 मीटर) इथपर्यंत पोहोचले आहेत. तेथे पोहचल्यावर त्यांनी शिवछत्रपतींचा भगवा ध्वज व भारतमातेचा तिरंगा ध्वज फडकाविला म्हणुन त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

             या महिन्यात ते एव्हरेस्ट या जगातील सर्वोच्च शिखरावर पोहोचतील आणि श्रीरामपूर साठी एक नवीन विक्रम प्रस्थापित करतील अशी आशा आहे. सुनील कांबळे यांना या पुढच्या एव्हरेस्ट मोहिमेसाठी सर्व श्रीरामपूरकरांच्या वतीने व दैनिक जयबाबा व शिवप्रहार न्युज परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा.