शिवप्रहार न्यूज -गडाख ने “मी तुला लाईक करतो”असे बोलुन, पाठलाग करुन केला तरुणीचा विनयभंग..

शिवप्रहार न्यूज -गडाख ने “मी तुला लाईक करतो”असे बोलुन, पाठलाग करुन केला तरुणीचा विनयभंग..

गडाख ने “मी तुला लाईक करतो”असे बोलुन, पाठलाग करुन केला तरुणीचा विनयभंग...

 नेवासा -नेवासा शहरातील गरुटे गल्ली या ठिकाणी आरोपी राहुल गडाख याने एका तरुणीचा मोबाईल नंबर मिळवून त्याद्वारे त्या तरुणीला फोन करून “तू मला आवडते,मी तुला लाईक करतो “असे बोलून प्रेमसंबंधाची मागणी केली.

       तसेच त्या तरुणीला वारंवार फोन करून,व्हॉट्सॲप कॉल करुन,व्हाट्सअप चॅटींग करून सात ते आठ महिन्यापासून ॲानलाईन पाठलाग (फोलो)केला. तसेच त्या तरुणीचे गडाख याच्याकडे फोटो असल्याचे त्याने तिला सांगून तिचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.    

         घडलेल्या या प्रकाराबाबत पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 394/2021 भादवि कलम 354, 354ड, 506 प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक श्री.करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री.भाटेवाल हे तपास करीत आहेत.