शिवप्रहार न्यूज- आज दुपारी नेवासारोड वरील रेल्वे अंडरग्राउंड पुलाखाली भलामोठा टँकर अडकला…

शिवप्रहार न्यूज- आज दुपारी नेवासारोड वरील रेल्वे अंडरग्राउंड पुलाखाली भलामोठा टँकर अडकला…

आज दुपारी नेवासारोड वरील रेल्वे अंडरग्राउंड पुलाखाली भलामोठा टँकर अडकला…

 श्रीरामपूर - श्रीरामपुर शहरातील नेवासा रोडवर असणाऱ्या रेल्वे अंडरग्राउंड पुलाखाली मोठ्या व अवजड वाहनांना जाण्यास परवानगी नसल्यामुळे या ठिकाणी लोखंडी रॉड लावून ठेवण्यात आलेला आहे. आज रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाचा भला मोठा ट्रँकर या रेल्वे अंडरग्राउंड पूलाजवळ असलेल्या रॅाडला अडकला.

       त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागले. एक तर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गोंधवणी रोडकडे जाणारा अंडरग्राउंड पुल वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे नागरिकांना नेवासा रोड अंडरग्राउंड पुलाचा वापर करावा लागत आहे.त्यातच आज टँकर अडकल्यामुळे श्रीरामपूर करांचे प्रचंड हाल झाले.