शिवप्रहार न्यूज-अल्पवयीन कॉलेज तरुणीचा विनयभंग करून मारहाण; पोक्सो गुन्हा दाखल…
अल्पवयीन कॉलेज तरुणीचा विनयभंग करून मारहाण; पोक्सो गुन्हा दाखल…
श्रीरामपूर- शहरातील बोरावके कॉलेजच्या आतील गेटसमोर काल सकाळी ११.१५ वा.एका १६ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीचा 'तु मला फार आवडेस' असे म्हणून शरीराला स्पर्श करून विनयभंग केला. विद्यार्थीनीने तिच्या बहिणीला सांगितले असता आरोपी अल्पवयीन याने पीडित विद्यार्थीनीच्या बहिणीच्या तोंडात चापट मारून घाणघाण शिवीगाळ केली. या घटनेने पालक वर्गासंह विद्यार्थीनींमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान विद्यार्थीनीने धाडसीपणाने थेट श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गाठले व तेथे फिर्याद दिली. त्यावरून आरोपी अल्पवयीन, रा.सुभेदारवस्ती, वार्ड नं. २, श्रीरामपूर याच्याविरूद्ध शहर पोलिसात भादंवि कलम ३५४, ३५४(ड) सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण सन २०१२ पोक्सो कायदा कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनास्थळी डिवायएसपी संदीप मिटके, पोनि. सानप यांनी भेट दिली. पोसई सुरवाडे हे आरोपी आरोपी अल्पवयीन असल्याने पुढील कायदेशिर मार्गाने तपास करीत आहेत. सदर अल्पवयीन आरोपी हा कॉलेजचा विद्यार्थी आहे किंवा नाही हे समजू शकले नाही.