शिवप्रहार न्यूज- राम मंदिर चौकाजवळ सोन्याचे दुकान फोडले…
राम मंदिर चौकाजवळ सोन्याचे दुकान फोडले…
श्रीरामपूर - शहरातील राम मंदिर चौक परिसरातील राम मंदिराजवळ असणाऱ्या बोहरा भवन या इमारतीमधील “अनिरुद्ध ज्वेलर्स” दुकान तीन अज्ञात चोरट्यांनी फोडले.
शटर उचकटून दुकान फोडल्यानंतर या चोरट्यांनी सुमारे साडेपाच किलो चांदी व दोन ग्रॅम सोने चोरून नेले.या घटनेनंतर दुकानाचे मालक अनिरुद्ध महाले यांनी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलिसांकडून चालू असून सदर घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे.