शिवप्रहर न्युज - घरासमोर झाडत असतांना विवाहित तरुणीचा विनयभंग;श्रीरामपूर तालुका पो. ठाण्यात गुन्हा दाखल…

घरासमोर झाडत असतांना विवाहित तरुणीचा विनयभंग;श्रीरामपूर तालुका पो. ठाण्यात गुन्हा दाखल…
श्रीरामपूर - श्रीरामपुर तालुक्यातील भोकर गाव परिसरात एका 31 वर्षीय तरुणीचा हि विवाहित तरुणी घरासमोरील अंगण झाडत असताना ०२ आरोपींनी झाडल्यामुळे धूळ उडते या कारणावरून वाद घालून महिलेला शिवीगाळ करून साडी ओढून विनयभंग केला.तसेच जीवे मारण्याची धमकी देखील दिली.
याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात पोपट वाकडे व संतोष वाकडे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहाय्यक फौजदार गायमुखे हे पोलीस निरीक्षक श्री.साळवे यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील तपास करीत आहेत.