शिवप्रहार न्यूज- माजी आमदाराच्या मुलीने नगरसेविकेच्या पतीला नगरपालीका तुझ्या बापाची आहे का?असे म्हणत केली घाण घाण शिवीगाळ...
माजी आमदाराच्या मुलीने नगरसेविकेच्या पतीला नगरपालीका तुझ्या बापाची आहे का?असे म्हणत केली घाण घाण शिवीगाळ...
श्रीरामपूरः- नुकतेच श्रीरामपूर नगरपालीकेत मुख्याधिकारी दालनात एका माजी आमदार पुत्राची व एका नगरसेविका पतीची चांगलीच बाचाबाची झाल्याची घटना घडली आणि त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मेडीयावर जोरात व्हायरल होवून त्याची बरीच चर्चा श्रीरामपुरात झाली होती.
वरील घटना ताजी असतांनाच आता एका माजी आमदाराच्या मुलीने एका नगरसेविकेच्या पतीला मोबाईल वर फोन करून ‘ तु आदिक बंधू-भगिनी सोबत का राहतो?,नगरपालीका तुझ्या बापाची आहे का?’ असे म्हणत घाण घाण शिवीगाळ केली व नगरसेविकेच्या पतीला व्हॉटस्अप वर ‘‘ धार्मिक शब्द ’’ वापरून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना श्रीरामपुरात घडली आहे.या बाबत नगरसेविकेच्या पतीने माजी आमदाराच्या मुलीविरोधात श्रीरामपुर शहर पेालीस स्टेशन मध्ये अदखलपात्र गुन्हाची तक्रार दिली आहे. श्रीरामपुर पोलीसांनी सदर गुन्हा नोंद केला असून गुन्हयाचा पुढील तपास पीएसआय सुरवडे हे करीत आहेत.
श्रीरामपूर नगरपालीका निवडणुक या वर्ष अखेरीस होवू घातली आहे.त्यामुळे श्रीरामपुरकरांना अशा अनेक घटना पाहयला मिळतील असे म्हटले तर वावगेे ठरू नये.