शिवप्रहार न्यूज -कोरोना संकटात नेतेमंडळीनी श्रीरामपूरच्या सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडू नये

शिवप्रहार न्यूज -कोरोना संकटात नेतेमंडळीनी श्रीरामपूरच्या सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडू नये

श्रीरामपूर- नगर जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे हातावर पोट असणारी गोरगरीब जनता उपासमारीच्या संकटात सापडली आहे.मागच्या वर्षीच्या लॉकडाऊन काळात नागरिकांकडे काहीतरी बचत शिल्लक होती  भीषण संकटात सापडलेल्या जनतेला नगरपालिका ,अशोक कारखाना , पंचायत समिती, बाजार समिती आमदार , खासदार अश्या सत्तास्थानी असणाऱ्या नेत्यांनी किराणा वाटून मदत करावी अशी मागणी संवेदनशील नागरिक करत आहे.
संकटात सापडलेल्या जनतेला या नेते मंडळींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श नजरेसमोर ठेवून पूर्ण मदत करणे गरजेचे आहे.सत्ताधीश नेतेमंडळीकडे मोठा निधी आहे तो निधी कोविड सेंटर सुरू करणे
किराणा वाटप करणे,यासाठी करावा नाहीतर जनता निवडनुकीत मदत करणार नाही कोरोना ऐवजी उपासमारीने लोक मरणार असतील तर काय उपयोग आहे लॉकडाऊनचा  असा सवाल संप्तंत नागरिक नेतेमंडळी व प्रशासनाला विचारत आहे.