शिवप्रहार न्यूज -18 ते 23 दरम्यान स्कोर असलेले ज्येष्ठ नागरिक श्रीरामपुरातील विघ्नहर्ता कोवीड सेंटरमध्ये डॉ.गाडे यांच्या उपचाराखाली झाले कोरनामुक्त...

शिवप्रहार न्यूज -18 ते 23 दरम्यान स्कोर असलेले ज्येष्ठ नागरिक श्रीरामपुरातील विघ्नहर्ता कोवीड सेंटरमध्ये डॉ.गाडे यांच्या उपचाराखाली झाले कोरनामुक्त...

18 ते 23 दरम्यान स्कोर असलेले ज्येष्ठ नागरिक श्रीरामपुरातील विघ्नहर्ता कोवीड सेंटरमध्ये डॉ.गाडे यांच्या उपचाराखाली झाले कोरनामुक्त...

श्रीरामपूर -श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोडवर असलेल्या बसंत बहार मंगल कार्यालयातील विघ्नहर्ता सेंटरमध्ये एचआर सिटी स्कोर 18 ते 23 च्या दरम्यान असलेले पाच रुग्ण फक्त एक ते दोन रेमडेसीवीर इंजेक्शन च्या डोसवर व डॉक्टर श्री.सुशील गाडे यांच्या उपचारा खाली बरे झाले. या कोरोना पेशंट मध्ये 01) रंजना दहिवाळ,वय-58, एचआरसिटी स्कोर 21, 02)वत्सलाबाई कदम,वय- 73,स्कोर 20, 03) केशव काळे,वय 50,स्कोर 23,04)सुरेश जगताप ,वय 55 ,स्कोर 18, 05)सुरेश पवार ,वय 40 ,स्कोर 21 या रुग्णांचा समावेश आहे. 

            आज या रुग्णांना श्रीरामपूरचे प्रांताधिकारी श्री.अनिल पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुष्पगुच्छ देऊन डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी बोलताना प्रांताधिकारी श्री. पवार म्हणाले की ,सर्व बरे झालेल्या रुग्णांचे मी अभिनंदन करतो तसेच सर्व प्रशासन , वैद्यकीय यंत्रणा कोरोना पेशंट व कोवीड सेंटर मधील टीम यांच्या पाठीशी उभी आहे. यामुळे कोवीड सेंटर टीमचे व कोरोना पेशंटचे मनोबल वाढण्यास मदत झाली.

             तसेच यावेळी विघ्नहर्ता कोवीड सेंटर चे डॉक्टर श्री.सुशील गाडे म्हणाले की,कोरोनाची चाचणी वेळेवर करा,आजार अंगावर काढू नका,ऐकीव माहितीवर अवलंबून राहू नका ,स्वतः स्वतःवर उपचार करू नका ,कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास त्वरित कोरड सेंटरची संपर्क साधा किंवा डॉक्टरशी संपर्क साधा,अफवांवर विश्वास ठेवु नका ,मास्क चा वापर करा ,नियमांचे पालन करा स्वच्छता ठेवा.

            यावेळी डॅा.प्रमोद गाडे,डॅा.सुशिल गाडे,डॅा.कौशिक,नयन ठोंबरे व विघ्नहर्ता कोवीड सेंटर टीम उपस्थित होती.