शिवप्रहार न्यूज -संगमनेरातील हल्लेखोरांना तात्काळ हजर करा - श्रीरामपूर विभाग अप्पर अधीक्षक सौ.दिपाली काळे ...

शिवप्रहार न्यूज -संगमनेरातील हल्लेखोरांना तात्काळ हजर करा - श्रीरामपूर विभाग अप्पर अधीक्षक सौ.दिपाली काळे ...

संगमनेरातील हल्लेखोरांना तात्काळ हजर करा - श्रीरामपूर विभाग अप्पर अधीक्षक सौ.दिपाली काळे ...

संगमनेर- शहरातील तीन बत्ती चौकात हिंसक जमावाने पोलीस कर्मचार्यांना मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेचे व्हीडीओ सोशल मीडियावर पसरल्याने संगमनेरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर विभागाच्या अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांनी संगमनेरात येत मौलाना व नगरसेवकांची शहर पोलीस ठाण्यात बैठक घेत शांततेचे आवाहन केले. बैठकीला संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने,शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख,मौलना काझी,जावेद जहागिदार,शौकत जहागिदार,नगर सेवक वासिम शेख,डॉ.दानिस शेख,आरिफ देशमुख,नुरमहंद शेख आदी उपस्थित होते.

तुमच्या भागातील जनतेने नियमांचे पालन करावे,यासाठी तुम्हीच प्रयत्नशील राहिले पाहिजे यापुढे नियमांचे पालन व्हावे अन्यथा कारवाई करावी होईल असे अप्पर अधीक्षकांनी सांगितले. तसेच या घटनेतील आरोपींना नेत्यांनी पोलिसासमोर हजर करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. पोलीसांची चुक असेल तर पोलीसांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी यावेळी बैठकीस उपस्थितांनी केली.

            पोलिसांच्या मारहाणीत जखमी झालेल्याची फिर्याद आल्यास संबधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात येईल असे यावेळी पोलीस अधिकाऱ्यानी सांगितले. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवुन असुन पाहीजे आरोपींना अटक करण्याचे काम चालु आहे.