शिवप्रहार न्युज - व्हिडिओ कॅाल रेकॅार्ड केल्याचे सांगून अश्लिल वर्तन करत महिलेने ०५ लाख खंडणी उकळली!!लोणी परिसरात खळबळ !!!
व्हिडिओ कॅाल रेकॅार्ड केल्याचे सांगून अश्लिल वर्तन करत महिलेने ०५ लाख खंडणी उकळली!!लोणी परिसरात खळबळ !!!
लोणी (शिवप्रहार न्यूज पोर्टल ) राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथील 41 वर्षाचा इसम शरद बाबासाहेब आहेर,राहणार -लोणी खुर्द याला मनीषा नावाच्या महिलेने फोनवर मेसेज केला.मोबाईल वरील मेसेज पाहून शरद आहेर याने सदर महिलेला फोन करण्यास सांगितले.तेव्हा तिने कॉल केले, व्हिडिओ कॉल केले.ती गोड गोड बोलू लागली.तेव्हा शरद आहेर यांने ती ओळखीची नसल्याने फोन कट केला.मात्र पुन्हा सदर महिलेने फोन करून मी तुमच्यावर विनयभंगाचा बलात्काराचा प्रयत्न केला असा गुन्हा दाखल करील तुमची बदनामी करील असे धमकावून भेटायला बोलावले.
ती म्हणाली मी तुमचे सगळे रेकॉर्डिंग केले आहे . तेव्हा शरद आहेर, लोणी खुर्द येथील बाजार तळ परिसरात २९ जूनच्या रात्री ७ -५० च्या सुमारास सदर ठिकाणी गेला असता तेथे मनीषा नावाची महिला होती.ती म्हणाली मीच तुम्हाला फोन केला असे म्हणत तिने शरद आहेर याच्या अंगाला झटून लगट करण्याचा प्रयत्न केला.तेव्हा शरद आहेर म्हणाला की तुम्ही असे करू नका मी तुम्हाला ओळखत नाही . तेव्हा महिलेने कपडे काढण्यास सुरुवात केली घाबरलेल्या शरद आहेर याने बदनामी च्या भितीपोटी पाच लाख रुपये दिले . ही खंडणी घेतल्यानंतर त्याचवेळी अंधारात लोणीतीलच रणजीत आहेर व श्रीकांत मापारी तेथे आले व शरद याला म्हणाले की आता तू इथून लगेच निघून जा.नाहीतर तुझी बदनामी करू ,राजकारणातून उठवू बदनामी होईल म्हणून आज अखेर याबाबत फिर्याद दिली नव्हती असे शरद बाबासाहेब आहेर यांने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले.
त्यावरून आरोपी रणजीत उत्तम आहेर,श्रीकांत तानाजी मापारी,दोघे -राहणार लोणी खुर्द व मनीषा राहणार, नाशिक या महिलेसह तिघां विरुद्ध भादवि कलम 388 ,389,120 ब,506 प्रमाणे खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक आठरे हे पुढील तपास करीत आहे.या घटनेने लोणी परिसरात खळबळ उडली असून ही मनीषा आणखी “कोणा कोणाला भावली” याची जोरदार चर्चा लोणी परिसरात सुरू आहे .