शिवप्रहार न्यूज-श्रीरामपूर परिसरात रेल्वे धडकेत एकाचा मृत्यू…

शिवप्रहार न्यूज-श्रीरामपूर परिसरात रेल्वे धडकेत एकाचा मृत्यू…

श्रीरामपूर परिसरात रेल्वे धडकेत एकाचा मृत्यू…

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -श्रीरामपूर रेल्वे हद्द परिसरात रेल्वे धडकेत एकाचा मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपुरातील बेलापूर रेल्वे स्थानक येथील रेल्वे रूळावर एका इसमाला रेल्वेची धडक बसल्याने तो चिरडून जागीच ठार झाला. मयताचे वय अंदाजे ५० असून तो कुठलचा? त्याचे नाव काय? तो रेल्वेची धडक बसेपर्यंत बेसावध कसा होता? का आणखी काही प्रकार? असे प्रश्न उपस्थित होत आहे. 

         बेलापूर रेल्वे स्टेशनचे प्रबंधक यांनी श्रीरामपूर तालुका पोलिसात फिर्याद दिल्यावरून अज्ञात इसमाच्या मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोनि.खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मयत कोण? याचा पुढील तपास हेकॉ. आडांगळे हे करीत आहेत.