शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात बहिणीच्या मैत्रीणीवर दानीशचा बलात्कार...
श्रीरामपुरात बहिणीच्या मैत्रीणीवर दानीशचा बलात्कार...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर शहर परिसरात राहणार्या एका 18 वर्षांच्या कॉलेज तरूणीवर ती मैत्रिणीकडे पेपर संच घेण्यासाठी गेली असता मैत्रिणीचा भाऊ लिंगपिसाट आरोपी दानिश जावेद मन्सूरी याने पीडित विद्यार्थीनीवर बळजबरी करत तिच्या गळयात हात घालून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून ‘माझे प्रेम आहे’ म्हणत बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. पीडित तरूणीने काल तिच्यावर बितलेला भयानक प्रसंग नातेवाईकांच्या मदतीने श्रीरामपूर शहर पोलिसात जाऊन सांगितल्याने आरोपी दानिश जावेद मन्सूरी याच्याविरूद्ध पीडित विद्यार्थीनीच्या फिर्यादीवरून भादंवि कलम 376(2)(एन), 354, 354ड, 5(एल), 6, 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी दानिश मन्सूरीला अटक करण्यात आली आहे.
या खळबळजनक घटनेप्रकरणी पीडित अत्याचारीत कॉलेज तरूणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तिची मैत्रिण ही तिच्यापेक्षा एक वर्गाने सिनिअर आहे. चांगली ओळख असल्याने दोघी विद्यार्थीनींंची मैत्री होती. त्यातून पीडित विद्यार्थीनीची मैत्रिणीच्या भावाबरोबर ओळख झाली. बारावीचे वर्ष असल्याने बारकोड व मागील वर्षीचे बारावीचे बोर्डाचे परीक्षाचे पेपर संच घेण्यासाठी मैत्रिणीच्या घरी विद्यार्थीनी गेली असता तेथे आरोपी दानिश मन्सूरी होता. त्याने घरात आलेल्या बहिणीच्या मैत्रिणीच्या गळयात हात घालून ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझ्याकडे लक्ष का देत नाही?’ असे म्हणून धरून जबरदस्तीने अंगावरील कपडे काढून विनयभंग करून शारीरिक संबंध करत लैंगिक अत्याचार केला. गळयात हात घालून फोटो काढले, व्हिडीओ केला. त्यावेळेला पीडित कॉलेज तरूणी प्रचंड घाबरलेली हेाती. आरोपीने विद्यार्थीनीला फोटा व्हायरल करण्याची धमकी देवून पुन्हा घरी भेटायला बोलवायचा व अत्याचार करायचा. सदर विद्यार्थीनीने बदनामीच्या भितीपोटी कोणाला काहीएक सांगितले नाही. शनिवार दि.25 नोव्हेंबर रेाजी दुपारी एफवायबीए चा पेपर संपल्यानंतर आरोपी दानिश मन्सूरी याने पीडित विद्यार्थीनीच्या मैत्रिणीला फोन करून तू मला हॉटेलमध्ये भेट, तू जर आज मला भेटली नाही तर मी तुझे फोटो, व्हिडीओ तुझ्या आईला पाठवून देईन, अशी धमकी दिली. मैत्रिणीसोबत पीडित विद्यार्थीनी बसस्टँडजवळील हॉटेल येथे गेले असता फॅमिली हॉलमध्ये बसविले. सेल्फी फोटो काढण्याचा प्रयत्न करून अंगाला झटून विनयभंग केला. तेथून पीडित विद्यार्थीनी मैत्रिणीसह निघून गेली. मी आता तुझे फोटो व्हायरल करतो, अशी धमकी दिली. तुुमको फेमस कर देता, असे धमकावले पीडित विद्यार्थीनीने काल घडलेली घटना आई, वडील, बहीण, मामा, मावशी यांना सांगितली. काल या प्रकरणी पीडित विद्यार्थीनीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. डिवायएसपी शिवपुंजे, पेानि.हर्षवर्धन गवळी यांनी घटनास्थळी भेट दिली. पोउनि.सोळंके हे पुढील तपास करीत आहेत. या घटनेने श्रीरामपूर शहरात व परिसरात एकच खळबळ उडाली असून विद्यार्थीनीने हिम्मत दाखवत घरच्यांना सांगितल्याने हा भयंकर प्रकार उघड झाला. सदरचा गंभीर प्रकार हा नुकत्याच प्रदर्शीत झालेल्या एका चित्रपटातील कथेप्रमाणे घडल्याचे बोलले जात आहे.