शिवप्रहार न्युज - गहु दळायला गेलेल्या तरुणीला गिरणी चालकाची मिठी...

गहु दळायला गेलेल्या तरुणीला गिरणी चालकाची मिठी...
अकोले (शिवप्रहार न्युज)- जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील देवठाण परिसरात राहणारी एक २१ वर्षाची तरुणी गावातीलच शिवनाथ गंगाधर सोनवणे याच्या गिरणीवर गहु दळण्यासाठी गेली होती. तेव्हा तरुणीला एकटे पाहुण शिवनाथ सोनवणे हा म्हणाला की, "तु माझे पोहे करून दे, मी तुझे गहु दळून देतो" असे म्हणत आरोपी सोनवणे याने तरुणीला मिठी मारून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला. तरुणीने विरोध करताच तिला शिवीगाळ करून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी आरोपीने दिली.
भरदिवसा सकाळी ११ वाजता हा प्रकार घडल्याने देवठाण परिसरात खळबळ उडाली असून पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी शिवनाथ सोनवणे याच्याविरुद्ध अकोले पोलीसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोनि.बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली हेकॉ.खाडे हे करीत आहे.