शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात जेलमध्ये आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न…
श्रीरामपुरात जेलमध्ये आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न…
श्रीरामपूर- शहरातील दुय्यम कारागृह जेलमध्ये बॅरेक नं. ४ येथे असलेला आरोपी अंडया उर्फ अक्षय आबासाहेब खंडागळे, वय-२२, रा.भिमनगर, वा.नं.६, श्रीरामपूर याने जेलमध्ये असताना तेथील पोलीस कर्मचाऱ्यांना म्हणाला की, आम्हा दोघा भावांना वेगळे का केले? असे म्हणत मी माझ्या जीवाचे बरेवाईट करून घेईन, असे म्हणून टाचणीसारख्या टोकदार वस्तूने स्वतःच्या हाताच्या दंडावर व उजव्या छातीवर ओरखडे करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सायं. ५.३० वा. हा प्रकार घडला. बंदोबस्तावरील पोलिसांनी तातडीने लक्ष दिल्याने अंडया उर्फ अक्षय आबासाहेब खंडागळे याला तात्काळ उपचार मिळाले.
याप्रकरणी पोहेकॉ. सुभाष खेडकर यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसात आरोपी अंड्या उर्फ अक्षय खंडागळे याच्याविरूद्ध भादंवि कलम ३०९ प्रमाणे आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोनि.सानप मार्गदर्शनाखाली सफौ.हापसे हे. पुढील तपास करीत आहेत.